Thursday 20 December 2018

वेड सह्याद्रीच: ढाक बहिरी...!

वेड सह्याद्रीच: ढाक  बहिरी...!

दोन महिने आमच्या लिस्ट मध्ये असलेला प्लॅन. मुंबईतुन पुण्यात शनिवारी जाणं झालं आणि सगळं इथंच घोड्याने पेंड खाल्लं. ट्रेकिंगचा बेत रविवारी ठरला आणि जमतील ती पोरं घेऊन Sunday morning ला आम्ही बाहेर पडलो. लोणावळ्याकडून गेल्यामुळे आम्हाला हे लांबच पडलं. पण तरीही सगळं आवाक्यात होतं. जातानाच two-wheeler च्या रोड ने google मॅप ने आम्हाला शेतातून वाट दाखवली ती पुढे जाऊन बंद पडली. वाट विचारत-विचारत आम्ही सांडशी गावात पोहचलो.





गावची लोकं तशी चांगलीच भेटली. गाड्या पार्क करून दुपारच्या जेवणाचं सांगून आम्ही ट्रेकचा  श्रीगणेशा केला. १० वाजले होते आणि २-३ पर्यंत यायचं असा "साधा सरळ" प्लॅन होता. पण असले प्लॅन आमच्या नशिबाने कधीच फाट्यावर मारलेत हे आम्ही विसरलोच. आम्ही वाट चुकलो; सुरवातीला नव्हे, सुरवात व्हायच्या आधीच चुकलो. आणि हे आम्हाला खूप नंतर समजलं. गावकर्यांना विचारून आम्ही ज्या सुळख्याकडे जायायच विचारलं होतं तिकडे आम्ही जात असताना आमची वाट संपली आणि पुढे कडा दिसला. आता हा कडा सर करायचा म्हंटल्यावर सगळ्यांचा हुरूप वाढला. जो-तो त्या जंगलात वाटा शोधू लागला. मला जी वाट सापडली ती चढायला अवघड तर होतीच पण निसरट पण होती, भरीत भर म्हणून जो दगड धरून वर चढायला ठरवायचो तो फुटून हाथात यायचा. असल्यातून वर आलो आणि खाली सांगितलं कि इथून येऊ नका दुसरी वाट बघा. त्यामुळे एक-दोन गेलीत दुसरीकडे वाट शोधायला. वर जाऊन बघितलं तर वाट कुठेच नाहीय, जिथून मी आलो तीही वाट नव्हतीच. वारं थांबून थोडं शांत झाल्यावर एक आवाज ऐकू आला, "मी अडकलोय - मी अडकलोय ". tilya कुठंतरी वाट शोधायला गेला आणि अडकून बसला. वरही जाता येईना अन खालीही येता येईना, अन हालताही येईना. अंदयाने जाऊन त्याला तिकडूनच कसतरी वर आणलं. बुटं गळ्यात अडकून वाघ वर चढला होता आणि येऊन रेड्यासारखा खाली पडला होता. इकडं खालच्यांना वर आणायचा काम चालूच होतं. रोहण्याने पाठीवरची बॅग काढून वर माझ्याकडे फेकली ती माझ्याकडे आलीच नाही. तशीच ती परत खाली पडत पडत गेली. शेवटी मी आणि अंदया खाली गेलो अन सगळ्यांना वर घेतलं. त्या भर उन्हात मला एक एकलर्सच चॉकलेट सापडलं, तेवढाच खुश होऊन खाल्लं. थोडं काली गेलो तर चिल्लर पडलेली सापडली, मग कंगवा, मग नॅपकिन. खाली जाऊन बघतोय तर बॅग ची चैन तुटून त्यातलं सामान सगळं बाहेर पडत आलं होतं. सगळं शोध घेतला आणि गाडीची चावी आणि wallet तेवढं शोधलं आणि वर आलो.





इथून पुढं पण सीन असाच. काही बदल नाही. वाट शोधत-शोधत एका कड्याजवळ आलो. हा खूप मोठा कडा असल्यामुळे चढणे काय शक्य नव्हते. त्या डोंगराला लागून लागूनच आम्ही चालायला लागलो. इतके चाललो इतके चाललो कि आम्हाला पण आता जरा जास्तच वाटायला लागलं. कारण आतापर्यंत वाट सापडायला हवी होती. पाणी तर कधीच संपलं होतं पण मघासारखा हुरूप अजूनही होताच त्यामुळे वाट सापडत नसली तरी शोधायची हुक्की होतीच. शोधता-शोधता पूर्ण डोंगराला पालथा घातला पण वाट काही सापडली नाही. शेवटी नाईलाजाने परत जावं लागणार होतं अन त्याचीच चर्चा करत असताना कोणाचातरी आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने जाऊन त्या लोकांना थांबवून वाट मिळवली. finally वाट सापडली, तब्बल ९.५ किमी च्या खडतर पायी प्रवासानंतर.



त्या लोकांकडून समजलं कि अजून खूप लांब आहे. जवळपास अर्धा पल्ला, पण या ट्रेक ला असं अजिंक्य सोडायचं नव्हतंच. ३ वाजले होते, १० वाजल्यापासून आम्ही फिरत होतो, ट्रेक तर complete करायचाच होता, हट्टच होता तो. बिनापाण्याचा तिथून पुढचा प्रवास आम्हाला रडकुंडीला आणत होता. कितीतरी stops घेतले पण ४:३० पर्यंत आम्ही पोह्चलोच. पण पायथ्याशी आल्यावर इथपर्यंत जे काही केलं त्याच सार्थक झाल्यासारखं वाटलं. मी-मी म्हणाऱ्याची फाटेल अशी ती चढाई, फक्त रस्सी चा आधार, महिलांना सक्त परवानगी का नाही हे डोळ्याने दिसत होतं. ट्रेक करताना असाच काहीतरी उराशी बाळगून असतो आम्ही, अश्यावेळी मनातली उंचावरची भीती अनुभवायची संधी मिळते. आणि हि संधी सोडू वाटत नाही... बाकी शब्दात सांगणं कठीण, तुम्ही स्वतः अनुभवा.


Monday 17 July 2017

वेड सह्याद्रीच: नाणेघाट, शिवनेरी


आठवड्याभर आधी प्लांनिंग झालं होतं 'जीवधन' ला जायायचं. नुसतं ठरलं नव्हतं तर गावाला सांगून झालं होतं. नाणेघाट जवळच ३-४ किमी जीवधन आहे म्हणून नाणेघाट विचारत विचारत गाड्या हाणत होतो. जाताना शिवरायांची जन्मभूमी 'किल्ले शिवनेरी' नजरेस पडलं. शिवनेरीच प्लॅन मध्ये नव्हतं पण आमच्या खूप जणांच्या मनात शिवनेरीने घर केलं होतं आणि सोडून जावं वाटत नव्हतं. पण मन घट्ट करून आम्ही ठरलेल्या ठिकाणी जाऊ असं म्हणून पुढे कूच केली. सुरवातीला पाऊस नव्हता पण शेवटच्या टप्प्यात पावसाने चांगलाच सप्पाट्टा चालवला.

तिथे एक चहा ची टपरी होती, मस्त पैकी चहा घेऊन थोडं फोटो सेशन केलं. पाऊस पण थोडा शांत झाला होता, नसर्गसौंदर्य बगुन 'परत' फोटो सेशन करावंच लागलं.
                                                 






मग पुढे नाणेघाट वर आम्ही जाऊन पोहचलो. नाणेघाट हा महाराष्ट्रतील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा घाटमार्ग सातवाहीन कालीन आहे. तिथं आम्ही जसं पोहचलो तशी सगळी जल्लोष करायला लागलीत. मोबा. ला नेटवर्क कोणाच्याच नव्हतं म्हणून मी तिथल्या ५-६  ड्राइवर ना जीवधन च्या रस्त्याबद्दल विचारपूस केली पण तिथं कोणालाच माहित नव्हतं. मग आमच्यातल्या काही जणांना नाणेघाट वरच खूप मज्जा यायला लागली. मग त्यांच्या मजेसाठी अशी १० प्लांनिंग कुर्बान. 'नाणेघाट' हाच आजचा प्लॅन असं ठरवून मज्जा लुटायला चालू केली. तसेच येथील मुख्य वाट, गुहा, जकातीचे पैसे-नाणी साठवण्याचा हंडा हे सर्व बघितलं. तसेच मज्जा म्हणून clumbing पण केलंच केलं.

मध्येच आम्हाला वाटलं कि अजून खूप वेळ आहे आपल्याकडे आणि आपण जीवधन नाही पण निदान शिवनेरी तर करूच शकतो. मग परत गाड्या काढल्या, आणि शिवनेरीकडे कूच केली. इथे दोन वाटा होत्या पण आम्हाला वेळ कमी असल्यामुळे आम्ही सोपी; 'सात दरवाज्याची' वाट निवडली.. १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या गडावर झाला होता. किल्यावर जिजाऊ आणि बाळ शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. तसेच चौथीच्या पुस्तकात बघितलेले शिवाजींचे जन्मस्थळ आणि त्यांचा पाळणा हे जेंव्हा प्रत्येक्षात बगायला मिळाले तेंव्हा तेंव्हा आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखं झालं.






"कधी कधी ठरलेल्याच गोष्टी व्हाव्यात असं काही नसतं, ज्या झाल्यात त्या किती चांगल्या झाल्यात हे बगण्याची नजर हवी फक्त, बास मग दुसरं काही नसलं तरी चालेल."
मग परतीच्या वाटा, 'अस्सल कोल्हापुरी' मध्ये तांबडा-पांढरा च जेवण, अणूंची भाकरी, आणि गाढ झोप.

सह्याद्रीचे वेडे 

Wednesday 12 July 2017

वेड सह्याद्रीच: कळसूबाई


महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरास कळसूबाई हे नाव का देण्यात आले, या विषयीची दंतकथा प्रचलित आहे. काही दंतकथांनुसार कळसूबाईने या उंच शिखरावर देहत्‍याग केला. त्‍यामुळे हे शिखर तिच्या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तेथे तिचे मंदिर उभारण्‍यात आले असे म्हटले जाते.
१८६० साली आर्चडीकन गेल ने रात्रभर कळसुबाई शिखराची चढाई केली आणि पहाटे सूर्योदय पहिला. त्या दृश्याने प्रभावित होऊन त्याने कळसुबाई शिखराला "द किंग ऑफ द डेक्कन हिल्स" असे म्हंटले.
समुद्रसपाटीपासून सुमारे १६४६ मीटर उंचीचे असणारे कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.
यावेळी आमच्या 'वेड सह्याद्रीच' या ग्रुप ने हाच बेत आखला आणि मोहीम फत्ते केली. मोहिमेत खूप साऱ्या अडचणी, पाऊस, मस्ती, चहा, नाष्टा अशी सरमिसळ भेळ दरवेळेप्रमाणेच होती. १६४६ मीटर उंचीवर जे वारं अनुभवायला मिळालं ते काही औरच.
नक्की बघा, पण पावसाळ्यात बगायची बातच निराळी.
#कळसुबाई
#वेड_सह्याद्रीच







दहावीचा निकाल



 दहावीचा निकाल: 
"ये मुडद्या, अर उठ कि, आज निकाल हाय नव्ह!, आज तरी उठ." रोजच्या प्रमाणे आईचा कलकलाट चालू झालाच होता, आणि ह्या कलकलाटाशिवाय मला जागबी येत नव्हती. जाग आल्यावर कळलं कि सगळे आज जरा वेगळ्याच मूड मध्ये आहेत, त्यात वातावरण पण कोमजल्यालं. हा तसा आज माझा दहावीचा निकाल होता पण एवढं काय सगळे घेऊन बसलेले काय माहित. मला तर माझी गॅरंटी होती कि नाही नाही म्हणता ७०-७५ % तरी मला हमखास पडतात. आज नुसतं रिसल्ट बगायचा, पेढं आणायचं आणि गल्लीतनं वाटत पाय पडत बसायचं एवढाच काय ते काम. मग पटापट आवरून जाता जाता जरासं देवाकडं नजर गेली आणि आपोआप पाया पडलो. हे automatic निकालादिवशीच कस काय घडत काय माहित?
सायकलीं सद्याकड गेलो, ते पण आवरूनच बसलेलं, संगऱ्यापण तिथंच आलंत. यांच्याकड बघितल्यावर मला आमचा अभ्यास आठवला मग जरासं जड जड वाटायला लागलं. पोलीस लाईनीत आम्ही कसा कसा अभ्यास केला यावर एक पुस्तक तयार होईल. मग इथं जराशी गॅरंटी खाली अली, ६५-७०%. असो काय वाईट नाही. मी आधी दिप्याच्यात अभ्यासाला जायायचो, तिथं मी, सम्या आणि दिप्याने दिवे लावले, मग मी त्यांना सोडलं अन हि दोन धरलीत अभ्यासाला, आणि इथं वाट लावायला आलो. त्या नेट कॅफ्फेत जाईपर्यंत 'आम्ही अभ्यास कधी केला?' हे आठवायचा खूप प्रयत्न केला पण साला काय आठवणच मग पेपर मध्ये किती लिहलं हे पण आठवना, मग जाऊदे म्हंटल, कळेल आता थोड्या वेळातच.
मधेच प्लॅन बदलला आणि आम्ही तिघे BSNL च्या ऑफिस मध्ये रिसल्ट बगायला गेलाव. तिथं एक मेंबर आम्हाला फुकट निकाल दाखवणार होता मग ३० रुपये वाचवायला आम्ही तिकडे कूच केली. तोवर फटाक्यांचा कोठूनतरी आवाज झाला आणि कोणतरी बेन पास झाल्याचा संकेत दिला
आता आम्ही वर गेलो होतो आणि सिन असा, तो मेम्बर निकालाची site काढून बसला होता आणि नंबर मागत होता आणि आम्ही तिघ एकमेकडे बगत होतो, कोणच तयार नव्हतं नंबर द्यायला, आदी तुझा दे मग माझा देतो असं चाललेलं मग संग्रानच दिला, त्याला म्हणावं इतकं चांगलं मार्क पडलं नव्हतं पण असुदे आता पडलं तर पडलं काय करणार, मग सद्याने नंबर दिला त्याला जरा लैच कमी पडलं पण तरीबी म्हंटल असुदे आता पडलं तर पडलं काय करणार. आता माझा नंबर दिला आणि म्हंटल आता जरा चांगलाच निकाल बगायला मिळेल, निदान ७०% तरी हमखास.
निकाल निघाला आणि तोंडातून शिवीच अली.
आईला, ५६% !!!!!! असं कस????? 

दहावीचा पहिला पेपर



मी आणि माझा #दहावीचा_पहिला_पेपर
उद्यापासून दहावीची परीक्षा सुरु होणार होती आणि "रितीरिवाजाप्रमाणे" आदल्या दिवशी नंबर कुठे पडलाय हे बगायला गेलो. घरातून पाठावर लेक्सि च्या पेनाने नंबर लिहून गेलेलो. शिवराज वर नंबर आणि मी मुरगूड विद्यालयाचा विध्यार्थी. आधीच या बोर्डाच्या परीक्षेची भीती आणि त्यात दुसऱ्या शाळेत जाऊन परीक्षा द्यायची म्हंटल्यावर ती जास्तच वाढायची. दर रविवारी शिवराजवर खेळायला गेल्यानंतर कधी काही वाटलं नाही पण आपली परीक्षा इथे होणार म्हणून कि काय पण ती इमारत भयानकच वाटली. आदल्या दिवशी अभ्यास सोडून माझ्यासारखे महाभाग तिथे खूप आले होते. दोन पोलीस पण होते पण त्यांना चुकवून काही जण वर चढलीत; त्यांच्यातूनच मी पण वर चढलो. जरी पोलिसांना सापडलो तरी दिसायला लहान आहे म्हणून मला काही ते मारणार नाहीत या हिशोबाने चढलो. चढलो खरा पण या चढण्याच्या नादात हाथावरचा नंबर पुसटला आणि तो काही केल्या ओळखेना. थोडाफार अंदाज लावून बघितलं F146981 तर असा कायतरी वाटत होता.. मग हुडकून काढला त्याला एकदासा; तर तो एका कोपऱ्यात शेवटून दोन नंबर ला भिंती कडेला होता. त्यावेळी थोडं मन मे लड्डू फुटा टाईप फीलिंग आली. मग खाली उतरून मित्रांच्या घोळक्यात आलो. सगळ्यांचं एकच ठरलेलं वाक्य चालू होत "माझा काय अभ्यासाचं झाला नाही बाबा"; मग मी पण त्यांच्या तेच वाक्य झाडून आलो. मग परतीचा मार्ग धरला आणि घरी आलो. माझ्यापेक्षा जास्त टेंशन घरच्यांनी घेतलं होतं पण तस मला काही अजून त्या लेवल च टेंशन आलं नव्हतं. त्या रात्री कधी झोपलो आणि कधी उठलो आठवत नाही. घरातून निघतानाच सांगून गेलो होतो कि कुणीही तिकडे यायचं नाही माझं मी एकटा जाईन. मी खूप रिलॅक्स आहे असं दाखवत होतो आणि मुळात होतोदेखील. पण जेंव्हा तुकाराम चौकातून शिवीवराज कडे जात होतो तेंव्हा हळू हळू त्या शाळेजवळची गर्दी दिसायला लागली. जेंव्हा पोलीस लाईन जवळ आलो तेंव्हा ती सगळी गर्दी डोळ्यात मावत नव्हती. तेंव्हा जरा जरा धाकधूक व्हायला लागलं. त्या गर्दीत गेलो, गप उभारलो, एकदा तिकडं बघितलं तर सगळी हुशारच पोर दिसत होतीत; हाथात कंपास, पट्टी, पॅड. तेंव्हा कळत नव्हतं त्या मराठीच्या पेपर ला कंपास कशाला लागायचा काय माहित. आणि पॅड अल्लावूड नसताना कशाला घेऊन पायचीत आणि आमचं टेंशन वाढवायचीत काय माहित नाही. माझ्याकडे तर पेन, पट्टी, id आणि त्या id मध्ये लपून ठेवलेला अंगारा. याव्यतिरिक्त कायपण नसायचं. भीती फक्त एकच होती कि स्कॉड आला आणि त्याला तो अंगारा सापडला तर तो मला कॉपी केस करून रेस्टिकेट नाही केलं म्हणजे बरं. पण नाईलाज होता त्यामुळे ठेवावाच लागला. नंतर आपला गॅंग भेटला मग जरा बरं वाटलं. त्यानंतर जेंव्हा आत यायची बेल झाली तेंव्हा परत काळजाचा ठोका चुकला. आत जात जात नंबर बगूया म्हणून जरा रिसीट बाहेर काढलं तर माझा नंबर F146901 आणि मी काल कुठला तिसराच नंबर बगुन खुश झालो होता. आता हा नंबर कुठं होता कुणास ठाऊक. त्याच टेंशन मध्ये आत गेलो तर आत घेताना चेक करून घेत होतीत, असा अनुभव पहिलाच सो आणखीन भीती वाटली. भीतीचा कहर तेंव्हा झाला जेव्हा माझा नंबर बरोबर दाराच्या समोर आला होता. त्या लेवल ची भीती त्याआधी कधीच वाटली नव्हती. मुकाट्याने जाऊन वर्गात त्या बेंचवर बसलो. सरांची वाट बगत...
आता यापुढचं काय सांगत नाही, जेंव्हा निकालाबद्दल लिहीन तेंव्हा तुम्हाला कळेल पेपर कसा गेला तो...
:- अक्षय गुजर (तुझं झालं कि मला दाखव संघटना ) #School_Days

Happy College Ending


Last sem जाळन धुर संगटच...63.80%
Big congratulations to all my classmates n best luck for your future
#Project_Viva_Internals
Late post..
Unforgettable 2 yr(5 yr from b.sc) statistician journey...
#सैराट_Exam n pending result by university n then dept jst felt like याड लागलय याड लागलं रं
But finally #झिंगाट %
Thanks to my parents , relatives, all teachers & friends...
This first class dedicated for u #Mummy...☺
And someone spl person Miss u lot n every dairy milk n chock-lets from you on my exam...
"Master's. झालो जी..."

Visit to Banglore


Banglore: खुप छान शहर... पण हे अजुन छान झाल ते या मित्रांसोबत घेतलेल्या चहामुळे... खूप मस्त वाटतं जेंव्हा मित्र या चहासोबत भेटतात... तस मला चहा सारखा घ्यायला आवडत नाही पण मित्रांसोबत tress free वेळ घालवन्याचा चहा हे एक उत्तम माध्यम आहे... या city ट पहिल्यांदा आगमन आणि जाताना घेऊन जातोय या गोड आठवणी... job साठी सर्वांचच strugle चालू आहे पण मी माझ्या मित्रांपासून अनुभवतोय की ते जॉब पेक्षा परत एकत्र कधी अन कस यायच याच प्लानिंग घालत असतात... आणि अश्या मित्रांमुळेच परत एकत्र यायला जमत... Thank you guy's... :):):)

Journey: from आजी विध्यार्थी to माझी विद्यार्थी...



🛫Journey: from आजी विध्यार्थी to माझी विद्यार्थी... 
🗓दिनांक 15 ऑक्टोबर; असचं फिरायच्या उद्देशाने बाहेर पडलो. ते pmt ने एक भारी केलय, 50 रु ला दिवसाचा पास, किती पण फिरा, कुठे पण फिरा, पैश्याचा💸 काय टेन्शन नाही.👌🏻 तसं खूप फिरलो पण गण्याला शनिवारवाडा बघायचा होता, आम्हाला तर बगून बगून कंटाळा आला होता पण त्याच्यासाठी जाऊया म्हंटल...
पण यावेळची मज्जा वेगळीच, आत जातानाच 15 दिवसापूर्वी काढलेली दोन तिकिटं दाखवून गेलो अन त्याने आजपण दोन तिकीट नाही फाडली...😜 त्या दरवाज्यातून आत जातानाच आमऱ्याचा हाथ आपोआपच वर झाला, बाजीरावसारखा, त्याच बगून माझा पण लगेच वर झाला अन आमचं बगून गण्याचीपण छाती फुगली...😁 आता शनिवार वाड्यात बाजीराव होते तेही former मध्येे; काशीबाई आणि मस्तनी दोघींचाही त्याग केलेले... त्यानंतर शिवाजीही होते, त्यांना आता कुठं दाढी येतेय... त्यानंतर बाहुबली होते, त्यांचं तर बेंगलोर मध्ये फक्त भात खाऊन कट्टाप्पा झालेत... आणि बाबा काय आहेत तशेच आहेत, no any बदल...😜
फिरून फिरून एका सावलीत गवतावर बसलो, संध्याकाळची ती वेळ मग काय, फ्लॅशबॅक मध्ये जाणं तर बनंतच ना भाऊ... त्या गवतावर बसून (मी झोपलो होतो हं) आठवणींच्या पुस्तकाची📖 पानं हळू हळू पलटलीत... ती कॉलेज मधली मज्जा,🙃 ते मुलींबरोबर भांडण,🙃 आपलं तेच खरं करणं,😉जबरदस्त.👌 आम्ही M.Sc च्या क्लास मध्ये 16 जण मुले होतो, पण सोळाच्या सोळा पात्र वेगळी होतीत, ते म्हणतात ना हाथाची बोटं सारखी नसतात तसच होत सगळं, आज या चर्चेत प्रत्येकाची आठवण झाली, हसून😂 हसून😂 तोंड दुखत होत अन एकमेकांना टाळ्या देत बोलणं चालू होतं; मी खात्रीने सांगतो, आज येथे कुणी एकट🚶🏻or फॅमिली👨‍👩‍👦‍👦 बरोबर आलं असेल अन त्यानं आमच्याकडे बघितलं👀असेल तर त्याला नक्कीच त्याच्या जुन्या मित्राची👬 आठवण झाली असणार एवढं मात्र नक्की...🎯

वेड सह्याद्रीच: ढाक बहिरी...!

वेड सह्याद्रीच: ढाक  बहिरी...! दोन महिने आमच्या लिस्ट मध्ये असलेला प्लॅन. मुंबईतुन पुण्यात शनिवारी जाणं झालं आणि सगळं इथंच घोड्याने पेंड ...